आगामी हंगामात डिस्‍टिलरी व इथेनॉल प्रकल्‍प सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:43+5:302021-03-30T04:13:43+5:30

गगनबावडा : कारखान्‍यामध्‍ये ४५ केएलपीडी क्षमतेच्‍या डिस्‍टिलरी व इथेनॉल प्रकल्‍पाची उभारणी अंतिम टप्प्‍यात असून, आगामी गळीत हंगामात हा प्रकल्‍प ...

Distillery and ethanol projects will be launched in the coming season | आगामी हंगामात डिस्‍टिलरी व इथेनॉल प्रकल्‍प सुरू करणार

आगामी हंगामात डिस्‍टिलरी व इथेनॉल प्रकल्‍प सुरू करणार

Next

गगनबावडा : कारखान्‍यामध्‍ये ४५ केएलपीडी क्षमतेच्‍या डिस्‍टिलरी व इथेनॉल प्रकल्‍पाची उभारणी अंतिम टप्प्‍यात असून, आगामी गळीत हंगामात हा प्रकल्‍प सुरू करणार असल्‍याचे प्रतिपादन कारखान्‍याचे चेअरमन व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या २६व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

‘साखरेचा किमान विक्री दर सध्‍या ३१०० रुपये असून, केंद्र शासनाने तो ३६०० रुपये करावा. साखरेच्‍या निर्यात व इतर अनुदानाची रक्‍कम प्राप्‍त होण्यास विलंब लागतो. परिणामी ऊस बिले अदा करण्यास अडचणी येतात. त्‍यामुळे केंद्र शासनाने अशा अनुदानाच्‍या रकमा वेळेत द्याव्‍यात. केंद्राने केलेले तीन जाचक कृषी कायदे रद्द करावेत, अशा मागण्‍यांचे तीन ठराव पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी मांडले. सभेपुढील सर्व विषय व आयत्‍यावेळी मांडलेल्‍या विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. उपस्थितांचे स्‍वागत व विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी केले. या ऑनलाइन सभेत बहुसंख्‍य सभासदांनी सहभाग नोंदवला.

सभेस कारखान्‍याचे संचालक बजरंग पाटील, मानसिंग पाटील, बंडोपंत कोटकर, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, चंद्रकांत खानविलकर, जयसिंग ठाणेकर, रवींद्र पाटील, श्यामराव हंकारे, उदय देसाई व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळ – पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या २६व्‍या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्‍याचे चेअरमन व पालकमंत्री सतेज पाटील.

Web Title: Distillery and ethanol projects will be launched in the coming season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.