चार तासांत ४० लाखांच्या नवीन नाणी, नोटांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:51+5:302021-02-08T04:20:51+5:30

या मेळाव्याचे उद्घाटन आरबीआय बेलापूर येथील महाप्रबंधक मनोज रंजन यांच्या हस्ते झाले. यावेळी बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक ...

Distribution of 40 lakh new coins and notes in four hours | चार तासांत ४० लाखांच्या नवीन नाणी, नोटांचे वाटप

चार तासांत ४० लाखांच्या नवीन नाणी, नोटांचे वाटप

Next

या मेळाव्याचे उद्घाटन आरबीआय बेलापूर येथील महाप्रबंधक मनोज रंजन यांच्या हस्ते झाले. यावेळी बँक ऑफ इंडिया कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर प्रमुख उपस्थित होते. एक ते वीस रुपयांपर्यंतची नाणी चलनात आहेत. त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरविण्यात आले आहेत. ही नाणी अस्तित्वात आणि चलनात आहेत. त्यामुळे ग्राहक, नागरिकांनी ती स्वीकारवीत, असे आवाहन मनोज रंजन यांनी केले. नागरिकांच्या सोयीसाठी हा मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये आरबीआयच्या नियमानुसार चलन वाटप करण्यात येईल, असे हेमंत खेर यांनी सांगितले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात दहा नागरिकांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते नाणी वाटप करण्यात आले. बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक शिवकुमार, कौशिक बराई, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते. करेन्सी चेस्टच्या इनचार्ज विमलादेवी सूर्यवंशी यांनी स्वागत केले. शाहूपुरी शाखेचे मुख्य प्रबंधक सी. बी. गुडसकर यांनी आभार मानले. दरम्यान, या मेळाव्यात पाच ते दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. एक, दोन, पाच, दहा, वीस रुपयांच्या नव्या नाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी बँकेकडून नोटा, नाण्यांची माहितीचा फॉर्म भरून घेण्यात आला. प्रदीप लोहार, स्नेहा कित्तुर, रवीशंकर, बालकृष्ण यादवेंद्र, आदींनी मेळाव्याचे संयोजन केले.

Web Title: Distribution of 40 lakh new coins and notes in four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.