‘मी भारतीय मोहिमे’अंतर्गत ७५ किलो जिलेबीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:45+5:302021-08-17T04:28:45+5:30

‘इंजिनिअरिंग असोसिएशन’मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात कोल्हापूर : येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये रविवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष ...

Distribution of 75 kg jellies under 'Me Bharatiya Mohime' | ‘मी भारतीय मोहिमे’अंतर्गत ७५ किलो जिलेबीचे वाटप

‘मी भारतीय मोहिमे’अंतर्गत ७५ किलो जिलेबीचे वाटप

Next

‘इंजिनिअरिंग असोसिएशन’मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

कोल्हापूर : येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये रविवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देश स्वातंत्र्य होण्याबरोबरच आपल्या असोसिएशननेदेखील ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ऐतिहासिक शिवाजी उद्यमनगरीच्या उभाणीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या पाठबळामुळे उद्योगनगरी सुजलाम्, सुफलाम् झाल्याने त्यांना अभिवादन करतो. अनेक उद्योजकांनी त्यांचा उद्योग सांभाळून समाजात उद्योगवाढीसाठी योगदान दिले. त्यांची कामगिरी गौरवास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे अध्यक्ष मेनन यांनी सांगितले. मुलींनी आत्मविश्वास वाढविला पाहिजे. लग्न ठरवितानाच सासरच्या मंडळींना पूर्वकल्पना देऊन आपले करिअर सुरू ठेवले पाहिजे, असे आवाहन लंडन येथील चिफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर लीना नायर यांनी केले. या कार्यक्रमात ‘उद्यमवार्ता’च्या स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे प्रकाशन अध्यक्ष मेनन आणि मुख्य संपादक नितीन वाडीकर यांच्या हस्ते झाले. सचिव दिनेश बुधले यांनी असोसिएशनतर्फे सभासद, कर्मचाऱ्यांसाठी पुढील आठवड्यात कोविशिल्डचे लसीकरण शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर, श्रीकांत दुधाणे, रणजित शाह, संजय अंगडी, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, हिंदूराव कामते, विश्वजित सावंत, शांताराम सुर्वे, अशोकराव जाधव, सुभाष चव्हाण, मुबारक शेख, सागर जाधव, सुरेश मंडलिक, विशाल मंडलिक, नलवडे, निवास मिठारी, वासुदेव घाडी, किरण चरणे उपस्थित होते.

फोटो (१६०८२०२१-कोल-इंजिनिअरिग असोसिएशन) : कोल्हापुरात रविवारी शिवाजी उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ताराराणी विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोल्हापूर : येथील ताराराणी विद्यापीठांमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा झाला. विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. एन. पवार, सचिव प्राजक्त पाटील, भारती शेळके, प्रा. ए. एम. साळाेखे, आदी उपस्थित होते.

नागरिका एक्स्पोर्टस् कंपनीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त यवलूज (ता. पन्हाळा) येथील नागरिका एक्स्पोर्टस् लिमिटेड कंपनीत ध्वजवंदन करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष (ऑपरेशन) आर. एन. एम्प्रान यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष आर. एन. एम्प्रान यांनी कंपनीतील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कंपनीचे उपव्यवस्थापक संतोष संकपाळ, कामगार युनियनचे अध्यक्ष दिलीप मिसाळ, पिंटू रामाणे, एम. जी. पाटील उपस्थित होते.

Web Title: Distribution of 75 kg jellies under 'Me Bharatiya Mohime'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.