‘मदत नव्हे तर कर्तव्य’ भावनेने शिवसेनेचे कसबा बावड्यात मदत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:59+5:302021-08-23T04:27:59+5:30
कोल्हापूर : कसबा बावड्यातील हजारो कुटुंबांना महापुराचा फटका बसला असून, ‘मदत नाही तर कर्तव्य’ या भावनेतून तेथील प्रत्येक पूरग्रस्त ...
कोल्हापूर : कसबा बावड्यातील हजारो कुटुंबांना महापुराचा फटका बसला असून, ‘मदत नाही तर कर्तव्य’ या भावनेतून तेथील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला शिवसेनेच्यावतीने मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. परिसरात शिवसेनेच्यावतीने शिवसहाय्य मदतीच्या वाटपाला सुरुवात केली आहे.
कसबा बावडा येथील शिवसेना विभागीय कार्यालय शिवनेरी येथून नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात १०० कुटुंबांना शिवसहाय्य म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. आठवड्यात कसबा बावड्यातील पूरग्रस्तांना घरोघरी किटचे वाटप होणार आहे.
अध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना काम करत नाही. दोनवेळच्या आमदारकीच्या काळाप्रमाणे या दोन वर्षातही कसबा बावडावासीयांशी आपले नाते अतूट आहे. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता १७ कोटी रुपये, बंधारा ते कसबा बावडा रस्त्याकरिता २५ लाख रुपये, बावड्यातील रस्त्याची कामे, पाणंदींचा विकास आदी कामांसाठी दोन कोटींच्यावर निधी वितरीत केला. बावडा स्मशानभूमीची सुधारणा, पाणंदींचा विकास, विविध ठिकाणी ओपन जीम, खेळणी, हायमास्ट लॅम्प आदी विकासकामे केली.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, विभागप्रमुख रवींद्र माने, राजू काझी, संजय लाड, उदय जाधव, गुरुदास ठोंबरे, राहुल माळी, अक्षय खोत, कपिल पोवार, विनायक बोनगे, सचिन पाटील, सचिन वावरे, दयानंद गुरव, जालिंदर पोवार, आदर्श जाधव, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
भगिनींच्या क्षीरसागर यांना राखी बांधून शुभेच्छा
कसबा बावडा परिसरातील भगिनींनी कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. अक्षय विजय खोत यांची अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल क्षीरसागर यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो नं. २२०८२०२१-कोल-शिवसेना०१
ओळ : कसबा बावड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रविवारी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले.
220821\22kol_5_22082021_5.jpg
ओळ : कसबा बावड्यातील पूरग्रस्त कुटूंबांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रविवारी जीवनवश्यक वस्तूंचे किट वितरण करण्यात आले.