दत्तवाड येथे पशुखाद्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:17+5:302021-08-17T04:30:17+5:30

दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक पशुपालकांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे जनावरांचा चारा व पशुखाद्य याचा ...

Distribution of animal feed at Dattawad | दत्तवाड येथे पशुखाद्याचे वाटप

दत्तवाड येथे पशुखाद्याचे वाटप

Next

दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक पशुपालकांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने जनावरांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे जनावरांचा चारा व पशुखाद्य याचा प्रश्न गंभीर बनला होता. नदीकाठी असणारे हिरवे गवत महापुरात बुडाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तर अनेकांना पशुखाद्यही उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादन घटण्याची शक्यता होती. याचा आर्थिक फटका पशुपालकांना बसणार होता. त्या पार्श्वभूमीवर संस्थेमार्फत पशुपालकांना प्रत्येक जनावरासाठी दहा किलो पशुखाद्य मोफत देण्यात आले. यावेळी बबनराव चौगुले, जयपाल नेजे, बापूसो चौगुले, संजय पोवाडी, कलगोंडा पाटील, आण्णासो पाटील, आदिनाथ चौगुले, अजित वठारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - १६०८२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथे पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बबनराव चौगुले, जयपाल नेजे, बापूसो चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Distribution of animal feed at Dattawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.