गारगोटी येथे सहयोग फाैंडेशनच्यावतीने मुलींना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:37+5:302021-09-02T04:53:37+5:30

गारगोटी : सहयोग फौंडेशन संचलित, भुदरगड सायकलिस्ट असोसिएशनमार्फत दरवर्षी अनाथ व गरजू मुलींसाठी सायकल वाटप उपक्रम घेतला जातो. ...

Distribution of bicycles to girls on behalf of Sahayog Foundation at Gargoti | गारगोटी येथे सहयोग फाैंडेशनच्यावतीने मुलींना सायकल वाटप

गारगोटी येथे सहयोग फाैंडेशनच्यावतीने मुलींना सायकल वाटप

Next

गारगोटी : सहयोग फौंडेशन संचलित, भुदरगड सायकलिस्ट असोसिएशनमार्फत दरवर्षी अनाथ व गरजू मुलींसाठी सायकल वाटप उपक्रम घेतला जातो. यंदा या उपक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडून गरीब विद्यार्थिनींना देण्यासाठी ५ सायकल सहयोग फौंडेशनकडे सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, गारगोटीचे माजी उपसरपंच मोहन शिंदे, सहयोग फौंडेशनचे सचिव रोहित तांबेकर, प्रथमेश मालंडकर, खजानिस गौरव पाटील, धनाजी कुरळे, अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, रणजित पाटील, संदीप चव्हाण, सिद्धार्थ केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सहयोग फौंडेशनचे अध्यक्ष सुशांत माळवी यांनी मानले.

फोटो ओळ

गारगोटी येथे सहयोग फौंडेशनच्यावतीने सायकल वाटप करताना सचिन घोरपडे, सुशांत माळवी, प्रथमेश मालंडकर, धनाजी कुरळे, रोहित तांबेकर आदी.

Web Title: Distribution of bicycles to girls on behalf of Sahayog Foundation at Gargoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.