‘नॅब’तर्फे दृष्टीहीन विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:52+5:302020-12-12T04:38:52+5:30
कोल्हापूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड(नॅब)च्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टीहीन ...
कोल्हापूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड(नॅब)च्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी महादेव बन्नीगीडदावर, प्रवीण हजारे, विनायक मगदूम, ओंकार गुरव, किशोर पाटील, रोहन लाखे, रॉजर कुतीनो, धीरज लोकरे, सिद्धराज पाटील, माधव नाईक, सूरज पोवार, आदित्य पाटील, रघुनाथ खोत, सुनित सुतार यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यासह उदय गुरव, विजया गुरव, बळिराम बुरुड, विजय कुबल, नीता पाटील यांना अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी बाळ पाटणकर, शिवानंद पिसे उपस्थित होते. डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मीना डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.
----
फोटो नं १११२२०२०-कोल-नॅब
ओळ : नॅबतर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिष्यवत्ती धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवानंद पिसे, विजय रेळेकर, बाळ पाटणकर, डॉ. मुरलीधर डोंगरे, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, मीना डोंगरे उपस्थित होत्या.
--
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब)च्या वतीने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.