गारगोटी ग्रा.पं.च्या वतीने दिव्यांगांना धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:10+5:302021-06-06T04:18:10+5:30
गारगोटी : समाजाच्या सर्वच स्तरातील आर्थिक आणि शारीरिक दुर्बल घटकांना राजकर्त्यांनी आधार द्यावा. त्यांच्या संगोपनासाठी पुढे यावे. शासनाच्या ...
गारगोटी : समाजाच्या सर्वच स्तरातील आर्थिक आणि शारीरिक दुर्बल घटकांना राजकर्त्यांनी आधार द्यावा. त्यांच्या संगोपनासाठी पुढे यावे. शासनाच्या विविध निधींचे त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांनी केले. गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित दिव्यांगांना धनादेश वाटप प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून देसाई बोलत होते. सरपंच संदेश भोपळे अध्यक्षस्थानी होते.
गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने ५ टक्के अपंग निधीतून शेकडो दिव्यांगांना एक हजार रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच स्नेहल कोटकर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश वास्कर, अस्मिता कांबळे, जयवंत गोरे सचिन देसाई, राहुल कांबळे, रूपाली कुरळे, मेघा देसाई, आशा भाट यांच्यासह सर्व सदस्य, दिव्यांग प्रतिनिधी मारुती कांबळे, ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते. आभार बजरंग कुरळे सर यांनी मानले.
०५ गारगोटी दिव्यांग
फोटो ओळ
गारगोटी ग्रापच्या वतीने दिव्यांगांना धनादेश वाटप करताना राहुल देसाई, संदेश भोपळे, स्नेहल कोटकर, प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे आदी