श्राध्दाच्या खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:29+5:302021-09-07T04:28:29+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : श्राध्दाच्या खर्चाला फाटा देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षक निशिकांत चोपडे यांच्या स्मृती ...

Distribution of educational materials by splitting the expenses of Shraddha | श्राध्दाच्या खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक साहित्य वाटप

श्राध्दाच्या खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक साहित्य वाटप

Next

पोर्ले तर्फ ठाणे : श्राध्दाच्या खर्चाला फाटा देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षक निशिकांत चोपडे यांच्या स्मृती चोपडे कुटुंबीयांनी जागवल्या. पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या पाच विद्यार्थीं-विद्यार्थिनींना मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केले. निशिकांत चोपडे यांच्या स्मरणार्थ यापुढे शाळेतून शिष्यवृत्ती परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे परशराम चोपडे यांनी सांगितले. यावेळी गुणवंत शिक्षक अशोक पाटील, गोविंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. परशराम चोपडे, सचिव एम. पी. चौगुले, मुख्याध्यापिका वंदना पाटील, प्रा. सुजाता चोपडे, शिक्षिका पी. एन. धांडोरे, डाॅ. शशिकांत चोपडे, समाधान कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

०६ मदत

पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत निशिकांत चोपडे यांच्या श्राध्दाला फाटा देऊन चोपडे कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केले.

Web Title: Distribution of educational materials by splitting the expenses of Shraddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.