सह्याद्री ॲकॅडमीच्यावतीने कलाकारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:19+5:302021-06-22T04:17:19+5:30
गारगोटी : गेल्या वर्षभरात कोरोना काळात कार्यक्रम बंद असल्याने अडचणीत आलेल्या कलाकारांना मदतीचा हात म्हणून नाधवडे (ता. ...
गारगोटी : गेल्या वर्षभरात कोरोना काळात कार्यक्रम बंद असल्याने अडचणीत आलेल्या कलाकारांना मदतीचा हात म्हणून नाधवडे (ता. भुदरगड) येथील एस. पी. फाऊंडेशन संचलित सह्याद्री करियर ॲकॅडमीच्यावतीने तालुक्यातील कलाकारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
समाजातील तरूण पिढीचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या सह्याद्री करियर ॲकॅडमीने तरूण पिढी घडविण्याबरोबरच वंचित असणाऱ्या कलाकारांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देऊन समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार कलाकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे यांनी काढले.
ते नाधवडे येथे एस. पी. फाऊंडेशन संचलित सह्याद्री करियर ॲकॅडमीच्यावतीने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे आणि ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष संग्राम पाटील, संचालक सुभाष देसाई, तालुकाध्यक्ष आश्रापा कांबळे, नामदेव पाटील, यशवंत पाटील, श्रीधर पाटील, अरुण पाटील सर, प्रवीण देसाई, मोहन वैराट, प्रियतोष पाटील, रोशन देसाई, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ
कलाकारांना संग्राम पाटील, सुभाष देसाई, जयवंतराव वायदंडे, मोहन वैराट यांनी साहित्य वाटप केले.