कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटप;: मोफत तांदळाचे ३२ हजार क्विंटल वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:33 AM2020-04-14T10:33:30+5:302020-04-14T10:35:43+5:30

जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शंभर टक्के वाटप होेण्याची शक्यता आहे.

Distribution of food grains to five lakh ration card holders in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटप;: मोफत तांदळाचे ३२ हजार क्विंटल वितरण

कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटप;: मोफत तांदळाचे ३२ हजार क्विंटल वितरण

Next
ठळक मुद्दे या योजनेतील १२ हजार ४०० मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे

कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शंभर टक्के वाटप होेण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत रेशनवर एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रती महिना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. या योजनेतील १२ हजार ४०० मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्याचे तीन दिवसांपासून वाटप सुरू झाले असून, आतापर्यंत ३२ हजार क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

‘प्राधान्य’ कार्डधारकांना ५ किलो धान्य
सध्या रेशनवर अंत्योदय कार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असे ३५ किलो धान्य वितरित केले जात आहे. उर्वरित प्राधान्यक्रमामध्ये असलेल्या केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू व २ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ वितरण होत आहे.

 

जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना रेशनवरील धान्याचे वाटप झाले आहे. तर तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल मोफत तांदूळ वितरित करण्यात आला आहे.
-दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
 

 

Web Title: Distribution of food grains to five lakh ration card holders in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.