माजगाव परिसरातील स्थलांतरित कुटुंबांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:59+5:302021-07-31T04:25:59+5:30
यवलूज : कासारी नदीला आलेल्या महापुरामुळे माजगाव व खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील अनेक घरांत पाणी शिरले होते. त्याचा ...
यवलूज : कासारी नदीला आलेल्या महापुरामुळे माजगाव व खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील अनेक घरांत पाणी शिरले होते. त्याचा फटका बसल्याने पूरग्रस्त कुटुंबांना प्रापंचिक साहित्यासह जनावरांना सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे लागले होते. त्यामुळे या कुटुंबांना शासन आदेशानुसार धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. माजगाव येथील २६ स्थलांतरित कुटुंबांना धान्य वाटप पूर्ण झाले असून खोतवाडी येथील ७७ कुटुंबांना धान्य वाटप सुरू आहे. यामध्ये दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ याचा समावेश आहे. अतिवृष्टीत माजगाव येथील दोन घरांची तर खोतवाडी येथील ७ घरे व एक गोठ्याची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पडळचे मंडल अधिकारी अजय लुगडे, तलाठी गीता पाटील, पोलीस पाटील महादेव साळवी, ग्रामसेवक राजकुमार शिंदे, दीपक घाडगे, कोतवाल विनोद कुंभार, विलास कांबळे, भैरू यादव यांच्या उपस्थितीत वाटप झाले.