आषाढीनिमित्त गरजू कुटुंबांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:39+5:302021-07-21T04:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : सांगरूळ (ता. करवीर) येथील वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त गरजू कुटुंबांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : सांगरूळ (ता. करवीर) येथील वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. त्याचबरोबर बाहेरील मंडप येथेे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी, केळीचे वाटपही करण्यात आले.
गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. आषाढी वारीसाठी गावातून पाचशेहून अधिक लोक पायी सोहळ्यासाठी जातात. दरवर्षी आषाढीनिमित्त बाहेरील मंडपातून गावात दिंडी सोहळा काढला जातो. मात्र, कोरोनामुळे गेली दोन वर्षे मोठ्या प्रमाणात सोहळा केला जात नाही. मंदिरात कोरोनाची जनजागृती करणारी विठ्ठल, पोलीस, डॉक्टर व नागरिकांची प्रतिकृती असलेली सुबक रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधत होती. त्याचबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद देण्यात आला व गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमांचे परिसरात कौतुक होत आहे.
फोटो ओळी : सांगरूळ वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. (फोटो-२००७२०२१-कोल-सांगरुळ)