रेशन दुकानदारांच्या अंगठ्यावर मोफत धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:36+5:302021-05-08T04:24:36+5:30
राज्य शासनाने १५ मे पर्यंत कडक लाकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गरीब व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ ...
राज्य शासनाने १५ मे पर्यंत कडक लाकडाऊन जाहीर केले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गरीब व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य शासनाने मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त करीत दुकानदारांच्या अंगठ्यानेच धान्य वितरणाची परवानगी देण्यात यावी, रेशन दुकानदारांना विमाकवच लागू करावे व अन्य मागण्यांसाठी १ मे पासून असोसिएशनने संप पुकारला होता. शासनाने या प्रमुख मागण्यांची दखल घेऊन रेशनकार्डधारकांचा अंगठा घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे सध्या रेशन दुकानदारांच्या अंगठ्यावर मोफत धान्य वाटप केले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून मोफत धान्य वाटप करीत आहेत. अन्य मागण्यांबाबत योग्य निर्णय शासनाने लवकर घ्यावा, अशी आमची मागणी असल्याने कदम यांनी सांगितले.