शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:16+5:302021-09-24T04:29:16+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारपासून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे. खाजगी ...
कोल्हापूर : महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारपासून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या मागणीला यश आले आहे, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची एकात्मिक आणि द्विभाषिक मोफत पाठ्यपुस्तके बालभारतीकडे उपलब्ध होती; पण राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा आदेश नसल्याच्या कारणास्तव कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील काही तालुके, कोल्हापूर आणि सांगली महानगरपालिका येथील शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले नव्हते. या पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, बालभारतीच्या संचालकांकडे संघटनेने सतत पाठपुरावा केला. त्याला यश मिळाल्याचे रसाळे यांनी सांगितले.