पोर्लेतील शाळेत स्वच्छतेचे साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:23+5:302021-02-11T04:25:23+5:30
पोर्ले तर्फ ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर शाळा नंबर या शाळेला महिंद्रा फायनान्सने गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छतेचे साहित्य ...
पोर्ले तर्फ ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर शाळा नंबर या शाळेला महिंद्रा फायनान्सने गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छतेचे साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक सर्व साहित्य देण्यात आले. यामध्ये झाडू, डस्टरपासून डस्टबिन, डेटॉल हँडवॉश, सॅनिटायझर, एन ९५ मास्क, फ्लोअर क्लीनर, रूम फ्रेशनर, कॉलीनसह २५ प्रकारच्या वस्तू देण्यात आल्या.
यावेळी महिंद्रा फायनान्सचे कुलकर्णी साहेब व त्यांचे सहकारी, गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर मिसाळ, सचिव संतोष बेलवाडे, चैतन्य सरनोबत, प्रकाश देशमुख, राकेश मोरबाळे, सागर खवरे, पोर्ले ग्रा. पं. सदस्य युवराज कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष संभाजी जमदाडे, शैलेश सुतार, मुख्याध्यापिका रंजना शेटे, स्नेहा लोखंडे, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गोपाळकृष्ण कालेकर यांनी केले. विकास शिंदे यांनी आभार मानले.