‘सिलाई’तर्फे जिद्द पुरस्कारांचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:12 AM2021-02-05T07:12:52+5:302021-02-05T07:12:52+5:30

कोल्हापूर : सिलाई वर्ल्डतर्फे संस्थापक दादा गुजर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल विक साजरा करण्यात आला. यानिमित्त सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण ...

Distribution of Jidda Awards by ‘Sewing’ | ‘सिलाई’तर्फे जिद्द पुरस्कारांचे थाटात वितरण

‘सिलाई’तर्फे जिद्द पुरस्कारांचे थाटात वितरण

Next

कोल्हापूर : सिलाई वर्ल्डतर्फे संस्थापक दादा गुजर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल विक साजरा करण्यात आला. यानिमित्त सिलाई जिद्द पुरस्काराचे वितरण संतसाहित्याचे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांच्याहस्ते झाले.

लायन्स क्लब पुणे सारसबाग डायलिसीस सेंटर, महात्मा फुले विद्या प्रतिष्ठानला अर्थसाहाय्य व सिंहगड येथील सेवाधाम वृद्धाश्रम येथे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह अर्थसाहाय्य व उबदार ब्लँकेटची भेट देण्यात आली. बारामतीमधील ओंकार वृद्धाश्रमात अशाच पद्धतीने भेट देण्यात आली. पुण्यातील ममता फौंडेशनमधील एचआयव्ही बाधित मुलांसाठी त्यांच्या आवडीचे कपडे, आवडीचे पदार्थ देऊन त्यांचा आनंद दि्वगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिलाईचे संस्थापक दादा गुजर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक अडचणींशी सामना करून ‘सिलाई वर्ल्ड’ हे सर्व कुटुंबांसाठी वस्त्रदालन जिद्दीने उभे केले. हीच जिद्द समाजामध्ये निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त झाली. पुण्यातील तीन, नांदेडमधील दोन अशा पाच महिलांना सिलाई जिद्द हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना शिवणयंत्रे देण्यात आली. या महिलांची जिद्द पूर्ण करण्यास या पुरस्काराचा नक्कीच उपयोग होईल, अशी भावना संस्थापक दादा गुजर यांनी व्यक्त केली. सिलाई वर्ल्ड केवळ व्यवसायच करीत नाही, त्यासोबतच आपले धागे, नाते, जोडलेले आहेत. समाजातील दुर्बलजनांबद्दल सामाजिक बांधिलकी आहे. याच भावनेतून या विकचे आयोजन केल्याची माहिती सिलाईचे संचालक सागर गुजर यांनी दिली.

फोटो : ०१०२२०२१-कोल-सिलाई

ओळी : सिलाई वर्ल्डचे संस्थापक दादा गुजर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच महिलांना जिद्द पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी महिलांना शिवणयंत्रे भेट देण्यात आली.

Web Title: Distribution of Jidda Awards by ‘Sewing’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.