शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:31+5:302021-06-02T04:18:31+5:30

कोल्हापूर : न्यू पॅलेस येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे कार्य समाजाला आधार देणारे आहे, असे उद्गार शाहू छत्रपती ...

Distribution of literature by alumni of Shahu Vidyalaya | शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे साहित्य वाटप

शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे साहित्य वाटप

Next

कोल्हापूर : न्यू पॅलेस येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे कार्य समाजाला आधार देणारे आहे, असे उद्गार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी येथे बोलताना काढले.

शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. माजी नगरसेवक नियाज खान यांच्या पुढाकाराने कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक साहित्याचे वाटप विविध घटकांना करण्यात आले, त्यावेळी शाहू छत्रपती बोलत होते.

सवित्रीबाई फुले रुग्णालयातील १०० रुग्णांना फूड आणि प्रोटिन्सची पॅकेट‌्स, शहर वाहतूक शाखेतील पोलिसांना १०० सॅनिटायझरच्या बाटल्या, स्मशानभूमीस शेणी, तेथील २० कर्मचाऱ्यांना रेनकोट, पांजरपोळ संस्थेला एक ट्रक चारा असे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मधुरिमा छत्रपती, प्राचार्या राजश्री पाटील, माजी नगरसेवक नियाज खान, जाहिदा खान, सावन माने, सई गायकवाड, सपना शिंदे, कुणाल शहा, प्रशांत कांबळे, सुप्रिया निंबाळकर, संग्राम सोळंकी उपस्थित होते.

फोटो क्रमांक - ०१०६२०२१-कोल-शाहू विद्यालय

ओळ - कोल्हापुरातील शाहू विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाहू छत्रपती यांच्या हस्ते समाजातील विविध घटकांना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मधुरिमा छत्रपती, नियाज खान, जाहिदा खान उपस्थित होते.

Web Title: Distribution of literature by alumni of Shahu Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.