आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्या सभासदांना कर्जवितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:05+5:302021-06-06T04:18:05+5:30

संस्थेने आजपर्यंत १२ सभासदांना ३६ लाखांचे मध्यम मुदतीचे कर्जाचे वितरण केले आहे. जिल्हा बँकेमार्फत वेगवेगळ्या कर्जाचे वितरण करण्यात येत ...

Distribution of loans to the members of Balasaheb Thackeray Vikas Seva Sanstha in Ajara | आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्या सभासदांना कर्जवितरण

आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्या सभासदांना कर्जवितरण

Next

संस्थेने आजपर्यंत १२ सभासदांना ३६ लाखांचे मध्यम मुदतीचे कर्जाचे वितरण केले आहे. जिल्हा बँकेमार्फत वेगवेगळ्या कर्जाचे वितरण करण्यात येत असून, तालुक्यातील ग्रामीण भागातील सेवा संस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक अशोक चराटी यांनी केले. या वेळी आजरा साखर कारखाना अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, संस्थेचे संस्थापक नगरसेवक संभाजी पाटील, युवराज पोवार, विभागीय अधिकारी जयवंत पाटील, निरीक्षक शिवाजी रायकर, चेअरमन इब्राहिम दरवाजकर, रामजी लिचम, शंकर पाटील, राजू पोतनीस, वसुली अधिकारी इब्राहिम इंचनाळकर, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव सुभाष पाटील यांनी मानले.

फोटो कॅप्शन - आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्यावतीने कर्जाच्या चेकचे वितरण करताना अशोक चराटी, प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील.

Web Title: Distribution of loans to the members of Balasaheb Thackeray Vikas Seva Sanstha in Ajara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.