समृद्धी फौंडेशनमार्फत साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:08+5:302021-05-05T04:38:08+5:30
समृद्धी फौंडेशन ही सेवाभावी संस्था आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांसह गरीब, गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे ...
समृद्धी फौंडेशन ही सेवाभावी संस्था आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांसह गरीब, गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप केली असून आश्रमशाळांतील मुलांना शालेय पोषण आहारासाठी उपयुक्त साहित्य,धान्य वस्तू स्वरूपात मदत तसेच सध्याच्या लाकडाऊनच्या काळात गरजूंना तसेच विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न संस्था करत असल्याचे अध्यक्ष विपुल खुपेरकर व उपाध्यक्ष अनुराधा पाटील यांनी सांगितले.
यावेळी गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक बबन कुंभार व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
०३ वारणानगर
फोटो ओळ-
वारनूळ (ता. पन्हाळा ) येथील गुरुकुल निवासी आश्रमशाळेत समृद्धी फौंडेशन बहिरेवाडी यांच्यावतीने साहित्याचे वाटप अध्यक्ष विपुल खुपेरकर, उपाध्यक्षा अनुराधा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बबन कुंभार व विद्यार्थी उपस्थित होते.