कोविड सेंटरला औषधे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:24+5:302021-05-29T04:19:24+5:30
कोविड सेंटरवर अत्यावश्यक असणारी मेडिकल औषध उपलब्ध करून शाहुवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनने दिलेला आधार हा मोलाचा असून संघर्षमय ...
कोविड सेंटरवर अत्यावश्यक असणारी मेडिकल औषध उपलब्ध करून शाहुवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनने दिलेला आधार हा मोलाचा असून संघर्षमय परिस्थितीत तो नवसंजीवनी देणारा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार गुरू बिराजदार यांनी व्यक्त केले.
शाहुवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने कोविड सेंटरवर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या मेडिकल औषध प्रदानप्रसंगी ते बोलत होते.
गट विकास अधिकारी अनिल वाघमारे म्हणाले की अत्यंत महत्त्वाच्या आणि आवश्यकप्रसंगी शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांनी केलेली मदत ही खूप महत्त्वपूर्ण आणि आधार ठरत आहे.
यावेळी राज्य संघटना सचिव मदन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर जिल्हा उपाध्यक्ष भरतेश कळंत्रे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंडल अधिकारी विश्वास डोंगरे, आरोग्य विस्तार अधिकारी उदय पाटील, मेडिकल असोसिएशनचे शिवाजी दळवी, विजय कुंभार, अंकुश घोडे पाटील ,सलीम कुडचे, संग्राम कारंडे, मनोजकुमार पाटील, दत्ता म्हावळे, भास्कर घोडके, मंगेश घोडके, विजय चव्हाण, सागर चौगुले ,अमित शेंडे, आदींसह तालुक्यातील मेडिकल व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो
शाहुवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील कोविड सेंटरवर मेडिकल औषध प्रदानप्रसंगी तहसीलदार गुरू बिराजदार , अनिल वाघमारे, भरतेश कळंत्रे आदी.