खासगी प्राथमिक शिक्षक समितीच्या पुरस्कारांचे उद्या वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:33+5:302021-01-15T04:21:33+5:30
कोल्हापूर : खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १६) दुपारी २ वाजता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षा गायकवाड ...
कोल्हापूर : खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १६) दुपारी २ वाजता शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘शिक्षण जागर’ पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराने जिल्ह्यातील २० शिक्षकांचा सन्मान करण्यात येईल. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील असणार आहेत, अशी माहिती शिक्षकसेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक शिक्षणदिनाचे औचित्य साधून गेल्या दहा वर्षांपासून समितीच्या वतीने ‘शिक्षण जागर’चे वितरण केले जात आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यातून पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेता आला नाही. हा कार्यक्रम शनिवारी होणार आहे. त्यामध्ये पंडित मस्कर, पांडुरंग पाटील, शिवाजी सोनाळकर, बादशहा जमादार, प्रल्हादसिंग शिलेदार, शिवाजी पाटील, अश्विनी अतवाडकर, अमोल गावडे (मुख्याध्यापक), मानसिंग हातकर, योजना पवार, गोरखनाथ वातकर, मंजिरी कुलकर्णी, विजय पाटील, सायली शेंडगे, अमोल वस्तरे, सलीम शेख, प्रवीण पाटील, संभाजी बोने, माया भोगांवकर, विश्वास कांबळे (सहाय्यक शिक्षक) यांना सन्मानित केले जाणार आहे. मानचिन्ह, फेटा, पुस्तक, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे भरत रसाळे यांनी सांगितले. यावेळी आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, नंदिनी पाटील, आदिती केळकर, महादेव डावरे, अनिल सरक उपस्थित होते.