साईसम्राट इन्स्टिटयूटतर्फे रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:30+5:302021-08-17T04:29:30+5:30

कोल्हापूर : जागितक पर्यावरणाचा समताेल बिघडत असून पर्यावरणाला दैवत मानून त्याच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साईसम्राट इन्स्टिटयूट, ...

Distribution of saplings by Sai Samrat Institute | साईसम्राट इन्स्टिटयूटतर्फे रोपांचे वाटप

साईसम्राट इन्स्टिटयूटतर्फे रोपांचे वाटप

googlenewsNext

कोल्हापूर : जागितक पर्यावरणाचा समताेल बिघडत असून पर्यावरणाला दैवत मानून त्याच्या संवर्धनासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साईसम्राट इन्स्टिटयूट, साईसम्राट अर्बन, सुपर्ब चहा व विविध उद्योगांचे प्रवर्तक विश्वस्त धैर्यशील विजयसिंह पाटील यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धैर्यशील पाटील यांनी वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत हाेते.

सम्राट पाटील म्हणाले, शेतकरी बांधव राबराब राबत आहेत. त्यामुळे शेतकरी व पर्यावरण यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी साईसम्राटकडून वृक्ष वितरण व वृक्ष लागवड केली जाते. यावेळी संचालक विलास झाडे, दिगंबर माळी, अवधूत पाटील, पंडित निकम, प्रा. संपत पाटील, प्रा. हणमंत काळे, ग्रामविकास अधिकारी बी. बी. पवार, तलाठी सचिन सावंत, राजेंद्र पाटील, विजय घोरपडे, सागर मोरे, राजू थोरात, जयवंत पाटील, संजय बनसोडे व तांबवे गावातील शेतकरी, उत्पादक उत्साहाने उपस्थित होते.

फोटो ओळी : साईसम्राट इन्स्टिटयूट,साईसम्राट अर्बन, सुपर्ब चहा व विविध उद्योगांच्यावतीने रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी धैर्यशील पाटील, सम्राट पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१६०८२०२१-कोल-साईसम्राट)

Web Title: Distribution of saplings by Sai Samrat Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.