सुनीता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालोपयोगी साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:30+5:302021-03-05T04:24:30+5:30
कोल्हापूर : अरुण नरके फौंडेशनतर्फे सुनीता अरुण नरके यांचा स्मृतिदिन मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप ...
कोल्हापूर : अरुण नरके फौंडेशनतर्फे सुनीता अरुण नरके यांचा स्मृतिदिन मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. यानिमित्त पोलीस उपनिरीक्षकपदी, बँक प्रोबेशनरी अधिकारीपदी व अन्य स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बाळ पाटणकर व रवींद्र उबेराॅय यांच्या उपस्थितीत झाला.
दरवर्षी फौंडेशनतर्फे स्मृतिदिनानिमित्त नामवंतांच्या व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात; मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्त अश्विनी जाधव, करिष्मा शेख, महादेव कांबळे, मंदार शिंदे, मंगेश कांबळे, अक्षय पाटील, सूरज आमते, नितीन बाबर (पोलीस उपनिरीक्षक) मयूर सोनवणे (बॅंक प्रोबेशनरी), सौरभ तावडे, तुषार पाटील, सचिन मुगडे (बँक क्लार्क), नीलेश माने (तलाठी), तुकाराम मोरे (शिक्षक) यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक स्निग्धा नरके यांनी केले.
उपक्रमांची माहिती संस्थेचे अध्यक्ष चेतन नरके यांनी दिली. फौंडेशनचे संस्थापक अरुण नरके, विश्वस्त दिलीप नरके, अजय नरके, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी, समारोप रमेश कांबळे यांनी केला.
फोटो :०४०३२०२१-कोल-अरूण नरके फौंडेशन
ओळी : अरुण नरके फौंडेशनतर्फे
सुनीता अरुण नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील रांगेत स्निग्धा नरके, चेतन नरके, दिलीप नरके, अरुण नरके, रामचंद्र पाटणकर, रवींद्र उबेराॅय, अजय नरके उपस्थित होते.