दूध संस्थांमुळेच ‘दिवाळी’ दूध फरकाद्वारे सव्वाशे कोटींचे वाटप : ‘संक्रांत’, ‘गुढीपाडवा’लाही रिबेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:00 AM2018-11-04T01:00:18+5:302018-11-04T01:02:36+5:30

राजाराम लोंढे । कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी यंदा उत्पादकांना तब्बल १२८ कोटी दूध फरकाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांची ...

Distribution of Twenty-five crores through 'Diwali' Milk Distribution Due to Milk Organizations: 'Sankrant', 'Gudi Padva' also Rebate | दूध संस्थांमुळेच ‘दिवाळी’ दूध फरकाद्वारे सव्वाशे कोटींचे वाटप : ‘संक्रांत’, ‘गुढीपाडवा’लाही रिबेट

दूध संस्थांमुळेच ‘दिवाळी’ दूध फरकाद्वारे सव्वाशे कोटींचे वाटप : ‘संक्रांत’, ‘गुढीपाडवा’लाही रिबेट

Next
ठळक मुद्देत्यामुळे दिवाळीबरोबरच या दोन्ही सणांत शेतकºयांना हातभार मिळत आहे.गावागावांत राजकारणासाठी दूध संस्थांचे पेव फुटले असले तरी त्याचा फायदा उत्पादकांना झालेला दिसतो.

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी यंदा उत्पादकांना तब्बल १२८ कोटी दूध फरकाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी खºया अर्थाने तेजोमय बनली आहे. बहुतांश संस्थांनी स्वत:च्या नफ्यातून या रकमेचे वाटप केले असून, दूध संघांकडून मिळणाºया फरकाचे ‘संक्रांत’ व ‘गुढीपाडव्या’ला, तर इतर ठेवींचे गणेशोत्सव, दसºयात वाटप केले जाते.

दिवाळीच्या लख्ख प्रकाशाने शेतकºयांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन सुखाचा प्रकाश पडला का, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी अलीकडील पाच-दहा वर्षांत दूध व्यवसायामुळे शेतकºयांची दिवाळीच खºया अर्थाने ‘तेजोमय’ होऊ लागली आहे. पूर्वी उसावर कुटुंबाचा चरितार्थ चालविताना शेतकºयांची दमछाक उडत होती. उसाचे कांडे जमिनीत लावल्यापासून सोळा महिन्यांनी तुटते, त्याचे पैसे सतराव्या महिन्यात मिळतात.

विकास संस्थेचे कर्ज भरल्यानंतर उर्वरित पैसे हातात येतात. मग त्या पैशांवर वर्षभर संसाराचा गाडा चालवायचा. अलीकडील दहा-पंधरा वर्षांपासून शेती व शेतकºयांना दूध व्यवसायाने तारले आहे. दर दहा दिवसांनी मिळणाºया दूध बिलांमुळे शेतकºयांची बाजारातील पत वाढली. शेतकºयांच्या घरात सण होऊ लागले.

दूध संस्था व दूध संघांच्या नफ्यातून उत्पादक शेतकºयांना दिवाळी सणासाठी दूध रिबेट दिले जाऊ लागले. यंदा ‘गोकुळ’च्या वतीने दूध फरकाच्या रूपाने जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांना ऐंशी कोटी रुपये दिले. दूध संस्थांनी आपल्या नफ्यातून एकूण दूध खरेदीच्या ५ ते १८ टक्क्यांपर्यंत रिबेट दिले आहे. ‘गोकुळ’ दूध संघाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे १२८० कोटींची दूध खरेदी केली आहे. सरासरी १० टक्क्यांप्रमाणे रिबेट दिली तरी १२८ कोटी रुपये उत्पादकांना दिले आहे. संघाकडून मिळालेला फरक बहुतांश संस्था मकर संक्रांती व गुढीपाडव्याला देतात. त्यामुळे दिवाळीबरोबरच या दोन्ही सणांत शेतकºयांना हातभार मिळत आहे.

‘रिबेट’साठी संस्थांमध्ये स्पर्धा
गावागावांत राजकारणासाठी दूध संस्थांचे पेव फुटले असले तरी त्याचा फायदा उत्पादकांना झालेला दिसतो. उत्पादकांना सोई-सुविधा देण्यापासून दूध रिबेट देण्यासाठी या संस्थांमध्ये स्पर्धा लागलेली असते. वर्षभरात दूधपुरवठा केलेल्या एकूण रकमेच्या २२ टक्के रिबेट देणाºया संस्था या जिल्ह्यात आहेत.

दुधाच्या पैशांवरच बाजारपेठ अवलंबून
पूर्वी उसाचे पैसे आल्यानंतर तीन-चार महिने बाजारपेठेत गर्दी व्हायची. आता दूध व्यवसायामुळे दर दहा दिवसांनी शेतकºयांच्या हातांत पैसे येऊ लागल्याने या पैशांवरच बाजारपेठेतील उलाढाल अवलंबून आहे.

Web Title: Distribution of Twenty-five crores through 'Diwali' Milk Distribution Due to Milk Organizations: 'Sankrant', 'Gudi Padva' also Rebate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.