जीवन आशय संस्थेतर्फे वडाच्या रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:27+5:302021-06-24T04:17:27+5:30
कोल्हापूर : शालेय मुलांसाठी काम करणाऱ्या जीवन आशय संस्थेतर्फे वटपौर्णिमेनिमित्त महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. माझी शाळा, हरित ...
कोल्हापूर : शालेय मुलांसाठी काम करणाऱ्या जीवन आशय संस्थेतर्फे वटपौर्णिमेनिमित्त महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. माझी शाळा, हरित शाळा, सुंदर शाळा याअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
सध्याच्या कोरोना काळात महिला घराबाहेर जाऊन वडाच्या झाडाचे पूजन करू शकत नाहीत, त्यामुळे हा उपक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी मुलांना रोपवाटिकेचे प्रशिक्षण देण्यात आले. चिंचवाड व मजले येथील सृजन शक्ती फाैंडेशनच्या जिजाऊ बालविकास व सृजनशक्ती बालविकास या शाळांनी विशेष सहभाग नोंदवला. लॉकडाऊन असतानाही ऑनलाईन शिक्षणाद्वारे मुलांनी पर्यावरण व निसर्गाशी जवळीक साधली. संस्थेच्या नयना पाटील, संजय पाटील, शैला टोपकर, शरद टोपकर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमातील मुलांना शालेयस्तरीय बक्षीस देण्यात येणार आहे.
--
फोटो नं २३०६२०२१-कोल-जीवन आशय
ओळ : कोल्हापुरातील जीवन आशय संस्थेतर्फे महिलांना वड़ाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.