जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सेंद्रिय गटांना वाहन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:15+5:302021-04-01T04:25:15+5:30
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्माच्या प्रकल्प ...
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक जालिंदर पांगरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच सेंद्रिय गटांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पीजीएस ऑरगॅनिक प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. महालक्ष्मी सेंद्रिय गटामार्फत सेंद्रिय भाजीपाला बास्केट भेट म्हणून देण्यात आले.
जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत एकूण ३८ गट स्थापन झाले आहेत. या गटांना वाहन खरेदीसाठी १.२० लाख रुपयांची तरतूद असून, महालक्ष्मी सेंद्रिय शेती उत्पादक गट, धरणगुत्ती (ता. शिरोळ), ब्रह्मदेव सेंद्रिय शेतकरी गट, सरंबळवाडी (ता. आजरा), शंभू महादेव सेंद्रिय शेती गट, खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) या गटांनी वाहन खरेदी केले आहे.
---