‘गोकुळ’च्या वितरकांचा आज संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:40 AM2018-10-22T00:40:56+5:302018-10-22T00:40:59+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील वितरकांनी दूधविक्रीच्या कमिशनमध्ये वाढीची मागणी करत आज, सोमवारी दूधविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; ...

Distributors of 'Gokul' are now in touch | ‘गोकुळ’च्या वितरकांचा आज संप

‘गोकुळ’च्या वितरकांचा आज संप

Next

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील वितरकांनी दूधविक्रीच्या कमिशनमध्ये वाढीची मागणी करत आज, सोमवारी दूधविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; त्यामुळे सुमारे लाख लिटर दूधविक्री ठप्प होण्याची शक्यता आहे. शनिवार (दि. २७) पर्यंत संघाने कमिशन वाढीचा निर्णय घेतला नाही तर ऐन ‘दिवाळी’त बेमुदत दूधविक्री बंद करण्याचा इशारा वितरकांनी रविवारी दिला.
दुधाच्या खरेदी-विक्रीचे दर वाढत असल्याने त्या प्रमाणात विक्री कमिशन वाढवून द्यावे, अशी मागणी कोल्हापूर शहरातील वितरकांची आहे. शहरात रोज सव्वा ते दीड लाख लिटर दुधाची विक्री होते. पावणेदोन वर्षांपूर्वी संघाने प्रतिलिटर २0 पैसे कमिशन वाढवून दिले होते; पण दोन वर्षांत म्हैस दूध खरेदी व विक्री दरात पाच ते सहा रुपयांची वाढ झाली; पण कमिशन वाढले नाही. स्पर्धक ‘अमूल’चे प्रतिलिटर तीन रुपये, तर ‘शाहू’चे २.८० रुपये कमिशन आहे, त्याप्रमाणे द्यावे, अशी मागणी ‘गोकुळ’ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती; पण संघाने त्याकडे लक्ष न दिल्याने आज दूध वितरण बंद करण्याचा निर्णय वितरकांनी घेतला आहे.
‘गोकुळ’च्या वितरकांतर्फे दुधाची आगाऊ रक्कम युथ बॅँक व पार्श्वनाथ बॅँकेत जमा केली जाते; पण रविवारी शहरातील ३00 हून अधिक वितरकांनी पैसे जमा केले नाहीत. दोन्ही बॅँकांच्या दारात कार्यक्षेत्रातील वितरक एकत्र आले होते. त्यांनी निदर्शने करून ‘गोकुळ’ने शनिवारपर्यंत कमिशन वाढविले नाहीतर ऐन ‘दिवाळी’त विक्री बंद करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला; त्यामुळे आज अनेक ठिकाणी ग्राहकांना दूध उपलब्ध होणार नाही. दरम्यान, ‘दूध ही अत्यावश्यक सेवा असून वितरकांनी अचानक दूध बंद केल्यान गैरसोय होणार आहे; त्यासाठी ‘गोकुळ’ने आज स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. ठिकठिकाणी दुधाचे टेम्पो उभे केले जाणार आहेत. त्याशिवाय एक टीमही तयार केली आहे.
मागेल त्याला दूध !
‘गोकुळ’ प्रशासनाने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘मागेल त्याला दूध’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १0 जणांची टीम तयार केली असून, किरकोळ विक्रेते व ग्राहकांनी त्यांना थेट संपर्क साधायचा आहे. अजय पवार (९३७१९८९८९८), हणमंत पाटील (८८०५१४६२६८), लक्ष्मण धनवडे (८६६८३७९०३६), प्रवीण देसाई (७४४७३८९६९६), सत्यजित पाटील (८९८३७०४०४०), संतोष पाटील (९६७३७७८०७६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘गोकुळ’ प्रशासनाने केले आहे.

Web Title: Distributors of 'Gokul' are now in touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.