जिल्ह्यात २५४ नव्या तलाठी सज्जांंची भर
By admin | Published: May 19, 2017 01:01 AM2017-05-19T01:01:07+5:302017-05-19T01:01:07+5:30
प्रशासनाची तयारी : लवकरच ठिकाणांची निश्चिती होणार; नवी पदे भरणार
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : झपाट्याने वाढत चाललेले नागरीकरण व लोकसंख्येचा विचार करून महसूल यंत्रणेचे काम गतीने व लोकाभिमुख होण्यासाठी सरकारने तलाठी सज्जे वाढवून या ठिकाणी पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने २५४ सज्जे होणार असून, तितकीच तलाठ्यांची पदे भरावी लागणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर तयारी सुरू झाली आहे.
दिवसेंदिवस नागरीकरण वाढत चालले असले तरी महसूल विभागातील तलाठी सज्ज्यांमध्ये वाढ झालेली नाही. परिणामी याचा ताण सध्याच्या तलाठ्यांवर पडत असल्याचे दिसत आहे. यासाठी नवीन सज्जांच्या पुनर्रचनेसाठी सरकारतर्फे नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींना मान्यता देऊन नवीन सज्जे करून यासाठी तलाठ्यांची पदे चार वर्षांत टप्प्याटप्प्याने भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी नेमलेल्या समितीने खातेदारांची संख्या, क्षेत्र (हेक्टरमध्ये), जमीन महसूल, लोकसंख्या, गावे या निकषांवर गुणांद्वारे जिल्ह्यातील नवीन सज्जांची संख्या निश्चित केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यात २५४ तलाठी सज्जे होणार असून, तितकीच पदे भरावी लागणार आहेत.
सध्या जिल्ह्यात ४६३ सज्जे आहेत. नवीन तलाठी सज्जांमुळे सध्याच्या सज्जांमधील काही गावे कमी होणार आहेत. यामुळे तलाठ्यांचा भार थोडा हलका होईल. नवीन सज्जांची संख्या निश्चित झाली असली तरी त्यांची ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही येणाऱ्या काळात होणार आहे. सद्य:स्थितीला राज्य शासनाने नवीन सज्जांसाठी मान्यता दिली असली तरी याचा शासन निर्णय झालेला नाही. या निर्णयानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
तालुकामहसूलतलाठी सज्जेतलाठी सज्जे
मंडळे(सध्याचे)(नवीन)
करवीर११६२३५
गगनबावडा०२०९०७
पन्हाळा०७४० २०
शाहूवाडी०६४१२१
चंदगड०६३७ ३१
गडहिंग्लज०७४३२५
राधानगरी०६३८२३
कागल०७५१ ०९
आजरा०४२६०५
भुदरगड०५३३१५
शिरोळ ०७३९१७
हातकणंगले०८४४४६
७६४६३२५४
नवीन तलाठी सज्जांमुळे तलाठ्यांचा भार थोडा हलका होणार