जिल्हा प्रशासन होणार गतिमान !

By admin | Published: January 6, 2015 11:45 PM2015-01-06T23:45:57+5:302015-01-07T00:05:20+5:30

नव्या वर्षाची नवलाई : सर्व शासकीय कार्यालये 'मे'अखेर आॅनलाईन करण्याचा मानस

District administration will be speeding! | जिल्हा प्रशासन होणार गतिमान !

जिल्हा प्रशासन होणार गतिमान !

Next

कोल्हापूर : नवीन वर्षात नवीन संकल्पना राबविण्याचा सर्वांनाच ध्यास लागलेला असतो, तसा तो जिल्हा प्रशासनालाही लागलेला आहे. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’, अशी नागरिकांची झालेली भावना झटकून देऊन नव्या बदलांचा स्वीकार करत जिल्हा प्रशासन पुढे वाटचाल करणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आॅनलाईन होणार आहेत.संगणकावर सात-बारा उतारे देण्याचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. गतिमानता, नेटकेपणा, सहजता आणि कार्यालयाअंतर्गत समन्वय साधण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. त्यादृष्टीने नवीन इमारतीचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला लागली आहे. हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल.
कोणती फाईल नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे आहे, कोणत्या अधिकाऱ्यांकडे किती कामाचा वर्कलोड आहे याची सविस्तर माहिती आॅनलाईन दाखविणारी संगणक प्रणाली तयार आहे. ती फक्त अ‍ॅडॉप्ट करायची बाकी असून नजीकच्या काही दिवसांत हे कामही पूर्ण केले जाईल. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा व शिरोळ या चार तालुक्यांतील महसूल विभागाचे सर्व रेकॉर्ड स्कॅनिंग करण्यात आले आहे. ७/१२, फेरफार, ‘क’, ‘ड’, ‘ई’, जन्म-मृत्यू दाखले यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नुसता नंबर टाकला की, संपूर्ण रेकॉर्ड देता येईल अशा पद्धतीची माहिती संकलन करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासाठी २०१५ हे नवीन वर्ष नव्या नवलाईचे, नव्या बदलाचे असणार आहे. (प्रतिनिधी)

कोल्हापूर महापालिका, इचलकरंजीतील काम बाकी
जमाबंदी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ७/१२ दाखले संगणकीकृत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. फक्त इचलकरंजी व कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील काम बाकी आहे. लवकरच आॅनलाईन ७/१२ दाखले मिळतील.

Web Title: District administration will be speeding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.