जिल्हा बँकेने शेतकऱ्यांची आर्थिक पत निर्माण केली-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:40+5:302021-09-03T04:24:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांची आर्थिक पत निर्माण करण्याचे काम केले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गावा-गावात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांची आर्थिक पत निर्माण करण्याचे काम केले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गावा-गावात आर्थिक चळवळ व चलन प्रवाह सुरू होणार असल्याने लोकांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी व्यक्त केले
कोपार्डे (ता. करवीर) येथे हनुमान विकास सेवा संस्थेत जिल्हा बँकेच्यावतीने मायक्रो एटीएमची सुविधा उद्घाटन कार्यक्रमात राहुल पाटील बोलत होते. यावेळी अर्थ व शिक्षण सभापती रसिका पाटील, करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, अमर पाटील, सरपंच शारदा पाटील, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी राहुल पाटील म्हणाले, जिल्हा बँकेने गेल्या अनेक वर्षांत शेतकऱ्यांना पीक कर्जासह विविध कर्ज योजना उपलब्ध करून दिल्याने सहज पतपुरवठा होऊ शकला आहे. आमदार पी. एन. पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम पीक कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी सुलभ कर्ज योजना सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक विकास झाला. मायक्रो एटीएममुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातच पैशाची उपलब्धता होणार असल्याने धावपळ थांबून वेळेची बचत होणार आहे. हा जिल्हा बँकेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे कौतुक केले.
यावेळी एस. के. पाटील, नामदेव पाटील, ए. डी. पाटील व संचालक मंडळ, सचिव युवराज आमते व सभासद उपस्थित होते. स्वागत सर्जेराव पाटील यांनी, तर आभार सागर पाटील यांनी मानले.
020921\20210902_111505.jpg
कोपर्डी ता करवीर येथे हनुमान विकास सेवा संस्था कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने मायक्रो एटीएम सुविधा उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील शिक्षण सभापती रसिका पाटील करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील अमर पाटील सरपंच शारदा पाटील संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील