कर्ज पुरवठा करताना जिल्हा बँकेने नाबार्ड तत्त्वप्रणालीचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:38+5:302021-07-05T04:16:38+5:30

माणगाव : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची आपली बँक म्हणून ओळखली जाते. मात्र, बँकेचे नियम आणि ...

The District Bank should use the NABARD principle in providing loans | कर्ज पुरवठा करताना जिल्हा बँकेने नाबार्ड तत्त्वप्रणालीचा वापर करावा

कर्ज पुरवठा करताना जिल्हा बँकेने नाबार्ड तत्त्वप्रणालीचा वापर करावा

googlenewsNext

माणगाव : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची आपली बँक म्हणून ओळखली जाते. मात्र, बँकेचे नियम आणि जाचक अटी बघितल्यानंतर, कर्ज प्रकरणे शेतकऱ्यांना नकोशी वाटू लागली आहेत. त्यामुळे गावा-गावातील सेवा संस्था अडचणीत आल्या आहेत. बँकेची स्थापना ही नफा मिळविण्यासाठी नसून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी आहे. बँकेने नियम व अटी सुधाराव्यात आणि शेतकऱ्यांना पीककर्ज धोरणात सवलती द्याव्यात, अशी मागणी हेरे (ता. चंदगड) येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव प्रसादे यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रसादे म्हणाले, जिल्हा बँक व सहकारी सेवा संस्थांची नाळ कर्ज प्रकरणावरून जुळली असताना, ती आता वेगळ्या वाटेने वाटचाल करीत आहे. ई-करार बोजानुसार २ लाखाचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी ४ लाखाचा बोजा पाहिजे, हे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे इ- कराराचे बंधन लादू नये. तसेच खावटी कर्जाचा व्याज दर कमी करावा, एखाद्या सेवा संस्थेचे क्रेडिट कमी करणे, भागभांडवलामध्ये नफा धरणे, भागभांडवलामध्ये नफा व ठेवी धरल्यामुळे नफा कमी होतो. त्यामुळे नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेतकऱ्यांना कर्ज दिले गेले पाहिजे, या प्रमुख तत्त्वाचा बँकेला विसर पडला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. इ-खावटीला प्रोत्साहन आणि पीक कर्जाला काटछाट, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. पीक कर्जाला जेवढी मंजुरी तितका कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी प्रसादे यांनी केली.

Web Title: The District Bank should use the NABARD principle in providing loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.