जिल्हा बँक पेन्शनधारक खातेदारांना देणार पाच लाखांपर्यंत कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:19+5:302021-09-07T04:29:19+5:30
पेन्शनधारक प्राथमिक शिक्षकांची पेन्शन बँक खात्यावर जमा होण्यास विलंब झाला तर दर महिन्याच्या एक तारखेला सदर खात्यावर ओवरड्राफ्ट मंजूर ...
पेन्शनधारक प्राथमिक शिक्षकांची पेन्शन बँक खात्यावर जमा होण्यास विलंब झाला तर दर महिन्याच्या एक तारखेला सदर खात्यावर ओवरड्राफ्ट मंजूर करण्याची सुविधा पेन्शनधारकांना दिली जाणार आहे. या वेळी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी या मागणीचे निवेदन मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
वसंतराव पाटील म्हणाले, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शन जमा होण्यामध्ये कधी कधी वेळ होतो, तसेच इतरही अनेक अडचणी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर बँकेने पेन्शनपोटी कर्ज देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
या वेळी सरचिटणीस एम. बी. जाधव, कागल तालुकाध्यक्ष दस्तगीर वस्ताद, अशोक डवरी, तानाजी नलवडे, पी. बी. पाटील आदी उपस्थित होते.
फाेटो ओळी : जिल्हा बँकेत पेन्शनर शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. या वेळी वसंतराव पाटील, बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, आर. के. पोवार, असिफ फरास आदी उपस्थित होते. (फोटो-०६०९२०२१-कोल-जिल्हा बँक)