जिल्हा बॅँक शिपायाला ४५ हजार पगार

By admin | Published: January 29, 2015 12:23 AM2015-01-29T00:23:22+5:302015-01-29T00:33:24+5:30

कर्मचाऱ्यांची चांदी : वर्षात चौथ्यांदा पगारवाढ, बँक पुन्हा गाळात रुतणार?

District Bankmaster gets 45 thousand salary | जिल्हा बॅँक शिपायाला ४५ हजार पगार

जिल्हा बॅँक शिपायाला ४५ हजार पगार

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) कर्मचाऱ्यांची वर्षात चौथ्यांदा पगारवाढ करण्यात आली. संचालकांनी जाता-जाता केलेल्या करारामुळे दर तीन महिन्यांनी आपोआपच पगारवाढ होते. या महिन्यात सरासरी १२०० ते १५०० रुपये पगारवाढ झाली असून, यामुळे शिपायाचा पगार तब्बल ४५ हजारांवर पोहोचला आहे. पगारवाढीच्या करारामुळे बॅँकेची रुळांवर आलेली गाडी पुन्हा गाळात रुतण्याची भीती संस्थाचालकांमधून व्यक्त होत आहे.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅँक कर्मचाऱ्यांपेक्षा ‘केडीसीसी’ बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार आहे. मुळात जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. बॅँकेचा व्यवस्थापन खर्च अजूनही तीन टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने बॅँक अजूनही धोक्याच्या बाहेर आलेली नाही. त्यामुळे गेले पाच वर्षे प्रशासक बॅँकेचा व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत; पण संचालकांनी केलेल्या करारामुळे दर तीन महिन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार आपोआपच वाढत आहेत. सध्या बॅँकेच्या क्लार्कचा पगार महिन्याला ३३ ते ३८ हजार रुपयांपर्यंत आहे. शिपायाचा पगार ३० ते ४५ हजार रुपये आहे. या पगारवाढीमुळे बॅँकेच्या ताळेबंदावर सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.


असे आहेत कर्मचाऱ्यांचे महिन्याला पगार
शिपाई - ३० ते ४५ हजार रुपये
लिपिक - ३३ ते ३८ हजार रुपये
शाखाधिकारी - ३८ ते ४५ हजार रुपये
असि. मॅनेजर - ४२ ते ५० हजार रुपये
तुलनात्मक स्थिती
जिल्हा बॅँकठेवीकर्र्जे पगारावरील खर्च
पुणे५५६४ कोटी४०५४ कोटी५५ कोटी (वर्षाला)
कोल्हापूर२४०० कोटी१८०० कोटी८२ कोटी (वर्षाला)

Web Title: District Bankmaster gets 45 thousand salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.