जिल्हा बँकेची नांदणी शाखा जिल्ह्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:29+5:302021-04-08T04:25:29+5:30

जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या ठेवीच्या उद्दिष्टामध्ये शिरोळ तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये नांदणी (ता. शिरोळ) येथील जिल्हा ...

District Bank's Nandani branch is the first in the district | जिल्हा बँकेची नांदणी शाखा जिल्ह्यात पहिली

जिल्हा बँकेची नांदणी शाखा जिल्ह्यात पहिली

Next

जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या ठेवीच्या उद्दिष्टामध्ये शिरोळ तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये नांदणी (ता. शिरोळ) येथील जिल्हा बँकेच्या शाखेने जिल्ह्यातील १९३ शाखांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल नुकताच जिल्हा बँक प्रधान कार्यालयातर्फे नांदणी शाखेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ठेवी संकलनासाठी शिरोळ तालुक्याला उद्दिष्ट देण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे शिरोळ तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला तर यामध्ये नांदणी शाखेने सर्वाधिक २०१ कोटी ठेवींचा टप्पा पार करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शाखेला २ कोटी १३ लाखांचा नफादेखील मिळाला आहे. जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बँकेचे कर्मचारी एन. आय. पिरजादे यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बी. बी. दानोळे, पी. बी. पाटील, एस. डी. रावण, एस. एल. लाटकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - ०७०४२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथे जिल्हा बँकेचे कर्मचारी एन. आय. पिरजादे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बी. बी. दानोळे, पी. बी. पाटील, एस. डी. रावण, एस. एल. लाटकर उपस्थित होते.

Web Title: District Bank's Nandani branch is the first in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.