कर्नाटकात तिसऱ्या शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांचे ग्राम वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:55+5:302021-03-20T04:21:55+5:30
राज्य सरकार व ग्रामीण भागातील नागरी समस्या सोडविण्यास आता कर्नाटकातील जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्राम वास्तव्य करावे लागणार ...
राज्य सरकार व ग्रामीण भागातील नागरी समस्या सोडविण्यास आता कर्नाटकातील जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्राम वास्तव्य करावे लागणार आहे.
ग्रामीण लोकांना जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयास कामाकरिता जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांचा 'चला गावाकडे' कार्यक्रम होणार आहे.
महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जिल्हाधिकारी एका ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतील. याबाबत संबंधित अधिकारी आठवड्यापूर्वीच तक्रार अर्ज स्वीकारतील.
सरकारी पेन्शन, स्शमानभूमी, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, मतदार यादी सुधारणा, पाणी समस्या, महापूर नुकसानभरपाई, आधारकार्ड आदी समस्यांचा विचार होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत प्रांत, सहाय्यक आयुक्त, तहसीलदार, महसूल निरीक्षक व तलाठी असा सरकारी लवाजमा उपस्थित राहणार आहेत. भेटीदरम्यान अधिकारीवर्गास गावातच मुक्काम करावा लागणार आहे.