शेतकरी संघाकडून जिल्हा उपनिबंधकांनी खुलासा मागवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:52+5:302021-03-19T04:22:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शेतकरी सहकारी संघात एका संचालकाच्या मुळ थकबाकीपोटी पेट्रोल पंपावरील पैसे भरल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर ...

The District Deputy Registrar sought clarification from the farmers' union | शेतकरी संघाकडून जिल्हा उपनिबंधकांनी खुलासा मागवला

शेतकरी संघाकडून जिल्हा उपनिबंधकांनी खुलासा मागवला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : शेतकरी सहकारी संघात एका संचालकाच्या मुळ थकबाकीपोटी पेट्रोल पंपावरील पैसे भरल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी संघाकडे खुलासा मागवला आहे. आठ दिवसात याबाबतचा खुलासा द्यावा, असे आदेश त्यांनी केले आहेत.

संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची संघ व्यवस्थापनाने उचल केली. संबंधित संचालकांच्या नावावर डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून या पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा अर्ज संबंधित संचालकाने दिला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गुरूवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संघाच्या सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली. सहकार विभागानेही याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी संघाकडे खुलासा मागितला आहे.

कोट-

शेतकरी संघाच्या व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. पेट्रोल पंपावरील पैशाची बाबही गंभीर असून संबंधितांकडून खुलासा मागितला आहे.

- अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)

Web Title: The District Deputy Registrar sought clarification from the farmers' union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.