जिल्हा उपनिंबधकांनी केली बाजार समितीत पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:03+5:302021-04-19T04:22:03+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा आढावा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी रविवारी घेतला. समिती ...
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा आढावा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी रविवारी घेतला. समिती प्रशासनाने सुरक्षिततेबाबतची माहिती सचिव जयवंत पाटील यांनी दिली.
कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बाजार समितीत भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा सौद्यावेळी मोठी गर्दी होते. त्यातून संसर्ग वाढण्यची भीती असल्याने बाजार समिती प्रशासनाने दक्षता म्हणून उपाय योजना केलेल्या आहेत. भाजीपाला व फळांच्या सौद्याच्या वेळेत बदल करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या नियोजनाची पाहणी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केली. त्यावेळी त्यांनी आणखी सूचना केल्या. यावेळी अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील, सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील, वरिष्ठ अभियंता अशोक राऊत यांच्यासह समितीचे अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी बाजार समितीला भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली. (फाेटो-१८०४२०२१-कोल-बाजार समिती)