जिल्हा शिक्षण संस्था संघा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:25 PM2018-11-27T17:25:41+5:302018-11-27T17:30:47+5:30

सर्व अनुदानित शाळांना नियमितपण वेतनेत्तर अनुदान मिळावे, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंध त्वरीत लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगींच्या गजरात मोर्चा काढण्यात आला.

District Education Institute Sangh Kolhapur District Collectorate Morcha | जिल्हा शिक्षण संस्था संघा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा

कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासह शिक्षण भरती पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.जिल्हयातील एक हजार शाळेचे संस्था चालक, शिक्षक, शिक्षककेत्तर कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्यने मोर्चात सहभागी झाले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हयातील एक हजार शाळा बंद; मोर्चास उत्सफुर्ते प्रतिसाद

कोल्हापूर : सर्व अनुदानित शाळांना नियमितपण वेतनेत्तर अनुदान मिळावे, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंध त्वरीत लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगींच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे प्रलंबित मागण्याचे निवेदन संघातर्फे देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासह शिक्षण भरती पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करण्यासाठी मंगळवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हयातील एक हजार शाळेचे संस्था चालक, शिक्षक, शिक्षककेत्तर कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्यने मोर्चात सहभागी झाले होते.

दसरा चौक येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख म्हणाले, शासन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था विस्कळीत करत आहे. पवित्र पोर्टलमुळे शिक्षण संस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र लढा देणे आवश्यक आहे.

सचिव प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, शासनाने शिक्षक भरतीचे सर्व अधिकार संस्थाचालकांकडून काढून घेतल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेसमोर प्रश्नचिन्ह आहे.प्राचार्य क्रांतिकुमार पाटील म्हणाले, शाळामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने गुणवत्ता कशी राखायची,असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, कार्याध्यक्ष बापूसाहेब शिंदे, डॉ. अभयकुमार साळुंखे, शिक्षण सभापती अमरीश घाटगे, नावेद मुश्रीफ, भैय्या माने, विरेंद्र मंडलिक, व्ही. जी.पोवार,आर. वाय. पाटील,बी. जी. बोराडे, आर.डी. पाटील,एम. एन. पाटील, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, रघू पाटील, प्रदीप साळोखे, मिलिंद बारवडे, समीर घोरपडे, एन. आर. भोसले, अशोक हुबळे ,संदीप पाटील आदी उपस्थित होते.

मागण्या अशा -
- २० टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना पुढील अनुदानाचे पुढील टप्पे मिळावेत.
- मूल्यांकन झालेल्या शाळांना त्वरित अनुदान द्यावे.
- जुनी पेन्शन योजना सुरू करा.
- बालवाडी शिक्षिका सेविकांना शासनाकडून वेतन मिळावे
-बालवाडी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा.


जिल्हयातील एक हजार शाळा बंद
शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शिक्षक संघाने केलेल्या शाळा बंद आवाहनाला जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शाळांनी शाळा बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा बंदमध्ये जवळपास १ हजार बंद ठेवण्यातआल्या. जिल्हयातील विविध ठिकाणाहून संस्थाचालक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे पाच हजार जण या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संघातर्फे करण्यात आला.
-------------------------
खासदार महाडिकांचा पाठिंबा
खासदार धनंजय महाडिक यांनीही आंदोलनास पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला आहे. या पत्रामध्ये महाडिक यांनी धनंजय महाडिक युवाशक्ती शिक्षण संस्थांच्या बाजूने असून याबाबत राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन महाडिक यांनी दिले आहे. हे पत्र संतोष आयरे यांनी आंदोलकांकडे सुपूर्द केले.


मुलांचे नुकसान होणार नाही
शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी एक दिवस शाळा जरी बंद ठेवल्या असले तरी, सुट्टीच्या दिवशी आज झालेले शैक्षणिक कामकाज सुट्टीच्या दिवशी भरून काढण्यात येणार असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी याप्रसंगी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून हा मोर्चा काढण्यात आला. शाळा बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेला शाळांचा परिसरात अशी शुकशुकाट होती.


कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासह शिक्षण भरती पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मार्गदर्शन करताना प्रा. जयंत आसगावकर

 

Web Title: District Education Institute Sangh Kolhapur District Collectorate Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.