जिल्ह्याला १४१ कोटींचा बोनस
By admin | Published: November 21, 2014 09:30 PM2014-11-21T21:30:52+5:302014-11-22T00:17:07+5:30
ऊसखरेदी कर माफी : जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांना होणार फायदा
प्रकाश पाटील - कोपार्डे -राज्य शासनाने अपारंपरिक उर्जा निर्मितीचे नवीन धोरण म्हणून सप्टेंबर २००८ मध्ये जे साखर कारखाने सहवीज निर्मिती प्रकल्प राबवतील अशा साखर कारखान्यांना दहा वर्षे ऊस खरेदी करात सूट केली होती. मात्र, साखरेचे घटलेले दर व ऊस खरेदी दरात झालेली भरमसाठ वाढ यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आलेल्या राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना ऊसखरेदी करात सूट दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २० कारखान्यांना १४१ कोटींचा बोनस मिळाला आहे.
सध्या बाजारात साखरेच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल २५०० ते २६०० रुपयांवर पोहोचल्याने किमान एफआरपी कशी द्यावयाची या आर्थिक कोंडीत कारखानदार होते. एवढी रक्कम देण्यासाठी शासनाने प्रतिटन अनुदान द्यावे अथवा विविध करातून शासनाला द्याव्या लागणाऱ्या करातून सुटका करावी, अशी मागणी कारखानदारांकडून हंगाम सुरू झाल्यापासून होत होती.
सध्या शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी संघर्षाची धार कमी केली असली तरी येत्या काळात किमान एफआरपीसाठी तरी संघटनांनी नाही लावला तरी शासन तगादा लावणार व एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याने व ती न दिल्यास कारखानदारांवर कारवाईचे संकेत राज्याचे मुख्य सचिव व ऊसदर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष क्षत्रीय स्वाधीन यांनी दिल्याने कारखानदारात असंतोष होता. यासाठीच भाजप सरकारने ऊस खरेदी करात सूट देऊन कारखानदारांना दिलासा दिला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे उपलब्ध ऊस लाख मेट्रीक टन व ऊस खरेदी करातून किती रक्कम बोनस मिळणार याची आकडेवारी (एफआरपीनुसार ऊस खरेदी धरून अंदाजे किती लाभ होणार याचा सारांश)
कुंभी-कासारी (कुडित्रे)५ लाख ७८ हजार७ कोटी ५१ लाख
भोगावती (परिते)६ लाख ८ हजार८ कोटी ८४ लाख
शाहू (कागल)७ लाख ३३ हजार९ कोटी ३४ लाख
राजाराम (बावडा)४ लाख १६ हजार४ कोटी ९९ हजार
दत्त (शिरोळ)८ लाख ७५ हजार१० कोटी ९३ लाख
दूधगंगा-वेदगंगा (बिद्री)७ लाख ६९ हजार१० कोटी १८ लाख
गडहिंग्लज (हरळी)३ लाख ४ हजार३ कोटी ६४ लाख
जवाहर (हुपरी)९ लाख ११ हजार११ कोटी ३८ लाख
मंडलिक, हमीदवाडा५ लाख ३६ हजार७ कोटी १० लाख
पंचगंगा (इचलकरंजी)५ लाख ८४ हजार७ कोटी ३० लाख
शरद (शिरोळ)४ लाख ९२ हजार६ कोटी २७ लाख
वारणा१४ लाख ९ हजार१७ कोटी ८८ लाख
डी. वाय. पाटील (पळसंबे)४ लाख ६४ हजार६ कोटी ३ लाख
दालमिया (आसुर्ले)४ लाख ६४ हजार६ कोटी ३ लाख
गुरूदत्त (टाकळी)४ लाख ७६ हजार६ कोटी ६९ लाख
उदय (बांबडे)२ लाख ९२ हजार३ कोटी ५० लाख
आजरा४ लाख २५ हजार५ कोटी ३१ लाख
इको चंदगड२ लाख ८८ हजार२ कोटी ६१ लाख
हेमरस५ लाख ४ हजार६ कोटी ५५ लाख
काय आहे ऊस खरेदी कर
कारखानदारांनी ऊस तोडून गाळपासाठी आणलेनंतर त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या दरावर पाच टक्केप्रमाणे खरेदी दर लावला जातो.
कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उतारा चांगला असल्याने किमान २४०० ते २५०० रुपये ऊस खरेदीवर कारखानदारांचे प्रतिटन द्यावे लागणार आहे व त्यावर प्रतिटन ऊस खरेदी कर लावला जातो.
सहवीज प्रकल्प असणाऱ्या कारखानदारांचे काय?
प्रत्यक्षात २००५ मध्ये ऊस खरेदी माफ करताना ज्या कारखान्यांनी सहवीज प्रकल्प सुरू केले आहेत, त्यांनाच हा ऊस खरेदीकर माफ होत होता. मात्र मागील वर्षी ऊस खरेदी कर सर्वच कारखान्यांना माफ केल्यानंतर सहवीज प्रकल्प असणाऱ्यांनी ओरड केल्यानंतर त्यांना १० वर्षांऐवजी ११ वर्षे ऊस खरेदीकर माफ केला होता. याही वर्षी सर्वच कारखान्यांना ऊस खरेदी माफ केल्याने सहवीज प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांचे आणखी एक वर्षे वाढवून ते १२ वर्षांपर्यंत करणार काय? याबाबत सहवीज प्रकल्पधारक कारखानदारांचे लक्ष लागले आहे.