Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:49 PM2019-10-18T12:49:46+5:302019-10-18T12:52:59+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत प्रशिक्षण सुरू आहे. या ठिकाणी टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधा केंद्रांमध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ निवडणूक कर्तव्यात असलेल्या कर्मचारी व पोलीस, होमगार्डस्नी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. २१) मतदानापर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

The district has so far voted for one and a half thousand posts | Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान

Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदाननिवडणूक कर्मचाऱ्यांसह, पोलीस, होमगार्डस्चा समावेश

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत प्रशिक्षण सुरू आहे. या ठिकाणी टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधा केंद्रांमध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ निवडणूक कर्तव्यात असलेल्या कर्मचारी व पोलीस, होमगार्डस्नी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. २१) मतदानापर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्या पथकांसाठी गुरुवारीही प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी, विवेकानंद कॉलेजमधील बापूजी साळुंखे स्मृतिभवन हॉल येथे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी, यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज येथे करवीर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व मतदारसंघांतील प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांसाठी व पोलीस, होमगार्डस्साठी टपाली मतदानाकरिता ५२ मतदान केंद्रांची सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ मतदान कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीत टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधांमुळे मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, निवडणूक विभागाकडून सीमेवरील सैनिकांसाठीही मतदानासाठी ८७५३ आॅनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यांवर मतदान होऊन त्या निवडणूक विभागाकडे यायला सुरुवात होणार आहे.

झालेले टपाली मतदान असे (आतापर्यंत)
विधानसभा मतदारसंघ       टपाली मतदान

  • चंदगड                                  ६४२
  • राधानगरी                             ८५३
  • कागल                                  ८२३
  • कोल्हापूर (दक्षिण)               ५७७
  • करवीर                                 ६१८
  • कोल्हापूर (उत्तर)                ३९३
  • शाहूवाडी                              ४०४
  • हातकणंगले                        ४६७
  • इचलकरंजी                         २७८
  • शिरोळ                                ५५३


मतदान साहित्याचे वाटप

व्होटर्स स्लिप (मतदान चिठ्ठी)ची नोंद असणारी नोंदवही, मृत मतदारांची यादी, नावांच्या आद्याक्षरांप्रमाणे (अल्फाबेटिकल) मतदारांची यादी अशा साहित्याचे जिल्हा निवडणूक विभागातर्फे गुरुवारी सर्व विधानसभांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले.
 

 

Web Title: The district has so far voted for one and a half thousand posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.