जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांची शिरोली गावास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:59 PM2020-09-24T16:59:35+5:302020-09-24T17:00:33+5:30
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेचे जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज अचानक शिरोली येथे सुरू असणाऱ्या कामाची पहाणी केली. शिरोली माळवाडी भागात भेट देऊन त्यांनी सर्वेक्षण कामाची तपासणी केली.
शिरोली -"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेचे जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज अचानक शिरोली येथे सुरू असणाऱ्या कामाची पहाणी केली. शिरोली माळवाडी भागात भेट देऊन त्यांनी सर्वेक्षण कामाची तपासणी केली.
गावातील कुटुंबाना आरोग्य पथकाने विचारलेल्या प्रश्नांची पडताळणी केली.आणि स्वतः कोरोना हा कसला आजार आहे, तो कसा होतो,त्याची लक्षणे काय, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंस बाबत स्वतः लोकांशी बोलून चौकशी केली. तसेच तपासणी प्रभावीपणे होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, आरोग्य सहायक एस. एस. पाटील, आरोग्य सहायक घोलपे, आशा सेविका अनिता रावण, आरती रावण, ग्रामपंचायत कर्मचारी हरि वंडकर, विनायक पेटकर, नितीन परमाज उपस्थित होते