जिल्हा माहिती कार्यालयाने शासनाची प्रतिमा उंचावली: वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 05:08 PM2020-02-07T17:08:36+5:302020-02-07T17:10:52+5:30

कोल्हापूर : पत्रकारितेच्या बदलत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाने आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल आणि सुधारणा करून शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम ...

District Information Office hoisted the image of the government: Vasant Bhosale | जिल्हा माहिती कार्यालयाने शासनाची प्रतिमा उंचावली: वसंत भोसले

कोल्हापुरातील जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते छायाचित्रकार अनिल यमकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत सातपुते, एस. आर. माने उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा माहिती कार्यालयाने शासनाची प्रतिमा उंचावली: वसंत भोसलेपूरस्थिती, निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कोल्हापूर : पत्रकारितेच्या बदलत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाने आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल आणि सुधारणा करून शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी येथे केले. पत्रकारितेसाठी खऱ्या अर्थाने माहितीचा स्रोत बनण्याचे कामही या कार्यालयाने केल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा माहिती कार्यालय येथे या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि निवडणुकीच्या कामकाजामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने, माहिती साहाय्यक एकनाथ पोवार, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संपादक भोसले यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

संपादक भोसले म्हणाले, शासकीय माहिती वस्तुनिष्ठ आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्याचा जिल्हा माहिती कार्यालय हा स्रोत आहे. या विभागाने माहिती जलद गतीने देण्याबरोबरच माहितीची विश्वासार्हता जपली आहे. कमी मनुष्यबळाचा चांगला उपयोग करून शासनाची प्रतिमा जनमानसात उंचावण्याचा या कार्यालयाने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

दिवसेंदिवस बदलणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील उपक्रमांना आणि सुविधांना माहिती विभागाने आपलेसे करून, उपलब्ध मनुष्यबळात अविरतपणे काम करून पत्रकारांना तसेच प्रसारमाध्यमांना विस्तृत माहिती देण्यासाठी या कार्यालयाने चालविलेले प्रयत्न ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे केलेले कौतुक हा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून या विभागाने खऱ्या अर्थाने उत्तम जनसंपर्क सांभाळण्याचे कामही सुरू ठेवले आहे.

एस. आर. माने यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ पोवार यांनी आभार मानले. यावेळी माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Web Title: District Information Office hoisted the image of the government: Vasant Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.