राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

By admin | Published: May 15, 2015 11:30 PM2015-05-15T23:30:40+5:302015-05-15T23:32:45+5:30

चाचणी स्पर्धेसाठी क्रीडा कार्यालयाचे सुभाष पोवार, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, एस. व्ही. सूर्यवंशी, सुरेश फराकटे, कृष्णात लाड, सतीश पाटील, अमोल आळवेकर, सचिन कोरवी आदींनी सहकार्य केले.

District level team for state level athletics competition | राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

Next

कोल्हापूर : मुंबई येथे ५ ते ७ जूनदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष व महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. त्यातून जिल्ह्याचे दोन्ही संघ निवडण्यात आले. विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत पुरुष व महिला अशा ११० खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यातून ४१ जणांचा संघ निवडण्यात आला.
निवड झालेला संघ असा : पुरुष - धीरज पाटील, हर्षल साठे (२०० मी.), शामराव दौडकर (४०० मी.), रामचंद्र लांबोरे (१०० मी.), सुभाष खाडे, दीपक मतसागर (१५०० मी.), विशाल माळवी, अमृत तिवले (११० मी. हर्डल्स), रोहित मांगले, प्रशांत सुतार (४०० मी. हर्डल्स), स्वप्निल चौगुले, अभिषेक भोपळे (३००० मी. स्टीपल चेस), संतोष गुरव (बांबूउडी), विजयपाटील (गोळाफेक), अनिकेत मोरे, गंगाधर दिवेकर (थाळीफेक), सुशांत भोसले, अभिजित देसाई (भालाफेक), विशाल गुरव, रोहित पंडे (१० किलोमीटर चालणे), राहुल परीट (लांबउडी), सूरज चव्हाण, अनिकेत गुरव (तिहेरी उडी), रामदास पाटील (उंचउडी),
मुली संघ - अमृता वडाम (१००, ४०० मी. धावणे), सपना डोईजडे, अनुराधा फडके (२०० मी. ), साधना कारंडे (१० हजार मी. धावणे), सुचित्रा साळोखे (२० कि.मी चालणे), पूजा शिंदे (उंचउडी), यशोधन पाचटक्के (थाळीफेक, गोळाफेक).
निवड चाचणी स्पर्धेसाठी क्रीडा कार्यालयाचे मार्गदर्शक सुभाष पोवार, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, असोसिएशनचे कार्याध्यक्ष एस. व्ही. सूर्यवंशी, सुरेश फराकटे, कृष्णात लाड, सतीश पाटील, अमोल आळवेकर, सचिन कोरवी आदींनी सहकार्य केले.

Web Title: District level team for state level athletics competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.