‘जिल्हा नियोजन’ बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:19 AM2017-08-02T01:19:02+5:302017-08-02T01:19:02+5:30

'District Planning' is unconstitutional | ‘जिल्हा नियोजन’ बिनविरोध

‘जिल्हा नियोजन’ बिनविरोध

Next
ठळक मुद्देकॉँग्रेसला १० जागा
ोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगरपालिका मतदारसंघातून १६ उमेदवारांनी १७ अर्ज आणि जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून दोन उमेदवारांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला या समितीत सर्वाधिक म्हणजे ४० पैकी १३ जागांवर संधी मिळाली आहे; तर त्याखालोखाल कॉँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांना संधी मिळाली आहे. नगरपालिका मतदारसंघातील पाच जागांसाठी २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघापुरती निवडणूक लागण्याची चिन्हे होती; परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये सामंजस्याने याबाबत चर्चा होऊन माघार घेतली गेल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली. ढोबळमानाने ४० जागांपैकी भाजप आणि मित्रपक्षांना २१ जागा, तर दोन्ही कॉँग्रेससह पाठिंबा देणाºया शिवसेनेच्या सदस्यांना १९ जागा देण्याचा निर्णय याआधीच झाला होता. त्यानुसार ही प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी काम पाहिले.जिल्हा परिषद मतदारसंघातीलनूतन सदस्यअरुण इंगवले, विजया पाटील, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, अशोक माने, प्रा. अनिता चौगुले, कल्पना चौगुले, महेश चौगले, मनीषा टोणपे, स्मिता शेंडुरे (भाजप), स्वाती सासने, प्रवीण यादव, आकांक्षा पाटील, वंदना जाधव (शिवसेना), पांडुरंग भांदिगरे, राहुल पाटील, भगवान पाटील, बंडा माने, वंदना पाटील, शिल्पा पाटील (कॉँग्रेस), विजय बोरगे, प्रियांका पाटील, जीवन पाटील, मनोज फराकटे, सविता भाटळे (राष्ट्रवादी), शिवाजी मोरे (जनसुराज्य), राहुल आवाडे (जिल्हा ताराराणी आघाडी), सुनीता रेडेकर (ताराराणी आघाडी), रसिका पाटील (अपक्ष), विद्या पाटील (युवक क्रांती आघाडी).महापालिका मतदारसंघातीलनूतन सदस्यसुनील पाटील (राष्ट्रवादी), माधुरी लाड, दीपा मगदूम (कॉँग्रेस), भूपाल शेटे (कॉँग्रेस)विजय सूर्यवंशी (भाजप), रूपाराणी निकम (ताराराणी आघाडी).नगरपालिका : नूतन सदस्य अलका स्वामी- इचलकरंजी, प्रवीण प्रभावळकर- मलकापूर (भाजप), हारुण सय्यद- गडहिंग्लज (राष्ट्रवादी), यास्मिन मुजावर - पन्हाळा (जनसुराज्य), तेजश्री भोसले- इचलकरंजी (कॉँग्रेस).‘लोकमत’ने २२ मे रोजी वर्तवला ‘बिनविरोध’चा अंदाज‘लोकमत’ने निवडणुकीच्या आधी तब्बल दोन महिने आधी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. नगरपालिका गटात अधिक अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक लागण्याची चिन्हे होती. मात्र इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने ‘लोकमत’ने दिलेल्या दोन महिन्यांपूर्वीच्या वृत्तावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

Web Title: 'District Planning' is unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.