‘झूम’च्या दुर्गंधीवरून अधिकारी फैलावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक-नागरिक संतप्त; प्रत्यक्ष जागेवर जाऊन तीन तास पाहणी; पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:13 AM2018-09-05T01:13:58+5:302018-09-05T01:14:39+5:30
कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या
कोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात बैठकीवेळी शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर अधिकाºयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सुमारे तीन तास पाहणी करून पंचनामे केले. त्यानंतर महापालिकेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.
शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार या परिसरात काही दिवस दुर्गंधी व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याबद्दल संतप्त नागरिकांनी ई वॉर्ड अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अधिकाºयांसोबत नागरिकांची बैठक झाली. प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर व क्षेत्र अधिकारी अविनाश कडलगे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अधिकाºयांनी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन सुमारे तीन तास पाहणी करून पंचनामे केले.
आंदोलनात सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, डॉ. लीपी मोहंती, सुमन पाटील, बी. एल. बर्गे, मनिंदर गुप्ता, स्नेहल कांबळे, राहुल कदम, लक्ष्मण माने, शिवाजी चोपडे केविन फर्नांडिस, नंदलाल कुमावत, गौरव कुसाळे, मुकुंद कदम, अतुल कवाळे, इरशाद फरास, दिनेश होनकळस, दिलजित चोपडे, प्रफुल्ल रोकडे, आदी उपस्थित होते.
कारवाईचा आग्रह
अधिकाºयांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार पाठवतो असे उत्तर दिले. त्यावर समाधान न झाल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार महापालिकेवर कारवाईचा आग्रह धरला. त्यावेळी कांबळे यांच्यासह नागरिकांची अधिकाºयांशी शाब्दिक वादावादी झाली.
शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य.
घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे होणाºया प्रदूषणाबाबत कोल्हापुरातील लाईन बझार, कदमवाडी परिसरातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात बैठकीवेळी अधिकाºयांना धारेवर धरले.