ग्रामसेवक युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी एन. के. कुंभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:36+5:302021-03-08T04:23:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी एन. के. कुंभार यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी एन. के. कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निरीक्षक म्हणून एल. बी. गलगुंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौतम कांबळे व सहायक म्हणून बाबासाहेब कापसे यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ( डी .एन. ई. १३६ ) जिल्हा शाखा कोल्हापूरच्या अकरा जागांसाठी निवडणूक लागली होती. दहा जागा बिनविरोध निवड करण्यात आल्या, तर एक जागा रिक्त ठेवण्यात आली. निवडीसाठी हंबीरराव पाटील, विनोद पाटील, राहुल सिद्धनाळे, सर्व तालुकाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
संघटनेच्या सभासदांनी दुसऱ्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. ग्रामसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अध्यक्ष एन. के. कुंभार यांनी दिली.
बिनविरोध पदाधिकारी पुढीलप्रमाणे
निवृत्ती कृष्णा तथा एन. के. कुंभार - अध्यक्ष.
रवींद्र कुंभार- कार्याध्यक्ष.
आनंदा तळेकर व सुजाता पाटील - उपाध्यक्ष.
कृष्णा सिताप - सरचिटणीस.
राजाराम पाटील - कोषाध्यक्ष.
बाजीराव पाटील - सहसचिव.
अशोक पाटील - संघटक.
महालिंग आकिवाटे - कायदे सल्लागार.
सुजाता कांबळे - महिला संघटक.