कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी टी. एस. दुर्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:18+5:302021-08-25T04:30:18+5:30
कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. टी. एस. दुर्गी (हातकणंगले) यांची, तर सचिवपदी ...
कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. टी. एस. दुर्गी (हातकणंगले) यांची, तर सचिवपदी प्रा. संजय मोरे (कोल्हापूर शहर) यांची एकमताने मंगळवारी निवड झाली. अध्यक्षस्थानी शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. पी. एन. औताडे होते. पीठासीन अधिकारी म्हणून प्रा. अशोक पाटील, आनंदराव देशमुख यांनी काम पाहिले.
सभासदांच्या चर्चेतून निवडलेल्या कार्यकारिणीची विशेष बैठक संघाच्या कार्यालयात झाली. जिल्ह्याचा विस्तार आणि प्रश्नांचा व्याप पाहता यावेळी दोन कार्याध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, दोन सहसचिव, बारा सदस्यांचा समावेश असलेली जम्बो कार्यकारिणी सन २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी गठीत केली आहे. त्यामध्ये प्रा. डी. बी. गायकर, तुकाराम सरगर (कार्याध्यक्ष), अमरसिंह शेळके, रामचंद्र गावडे, संदीप सावगावे (उपाध्यक्ष), शिवाजीराव होडगे (कोषाध्यक्ष), नारायण राणे (सहकोषाध्यक्ष), बी. के. मडीवाळ (सहसचिव), अनिता चौगले (परीक्षा विभागप्रमुख), अमर चव्हाण, चंद्रशेखर कांबळे (प्रसिद्धी विभागप्रमुख), उदय आतकिरे, शशिकांत खोराटे, नामदेव चोपडे, अनिल पाटील, अरविंद पाटील, नितीन पोतदार, कुंडलिक जाधव, अरविंद सावंत, अमित रेडेकर, विकास माने, संध्या खरात, विद्या शेवाळे यांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-प्रा. टी. एस. दुर्गी
फोटो (२४०८२०२१-कोल-टी एस दुर्गी (शिक्षक संघ), संजय मोरे (शिक्षक संघ)