दि हॉकी कोल्हापूरतर्फे जिल्हा संघाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:34+5:302021-09-15T04:29:34+5:30

कोल्हापूर : हॉकी इंडियामार्फत ऑक्टोबरमध्ये ज्युनिअर मुले आणि वरिष्ठ गटाच्या महिला हॉकी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी हॉकी महाराष्ट्रतर्फे दोन्ही ...

District team selected by The Hockey Kolhapur | दि हॉकी कोल्हापूरतर्फे जिल्हा संघाची निवड

दि हॉकी कोल्हापूरतर्फे जिल्हा संघाची निवड

Next

कोल्हापूर : हॉकी इंडियामार्फत ऑक्टोबरमध्ये ज्युनिअर मुले आणि वरिष्ठ गटाच्या महिला हॉकी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी हॉकी महाराष्ट्रतर्फे दोन्ही गटांसाठी निवड चाचणी बालेवाडी (पुणे) येथे होणार असून, त्यासाठी दि हॉकी कोल्हापूरच्या वतीने धनराज पिल्ले क्रीडांगणावर जिल्ह्यातील ज्युनिअर मुले आणि वरिष्ठ गट महिला हॉकी खेळाडूंची निवड चाचणी शनिवारी आणि रविवारी झाली. त्यात जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळातील ३५ पुरुष, महिला खेळाडू सहभागी झाले.

ज्युनिअर संघासाठी निवड झालेल्या मुलांच्या संघात तन्मय जाधव (त्र्यंबोली प्ले कॉर्नर), विवेक दुर्गुळे (देवगिरी फायटर्स), प्रणम चौगुले (महाराष्ट्र क्रीडा मंडळ), आदित्य कुंभार (शाहू फाउंडेशन), सिद्धार्थ मोरे (छावा मित्रमंडळ), ओंकार भोसले (पद्मा पथक), राजरत्न कांबळे (डीएनएफ इचलकरंजी), राखीव खेळाडू : स्वप्निल कुऱ्हाडेे (श्याम स्पोर्ट्स), यशवर्धन गुरव (शाहू फाउंडेशन) यांचा समावेश आहे. वरिष्ठ गट महिला हॉकी संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये वैष्णवी भोईटे, शिवानी भोईटे, हर्षदा लाड, साक्षी झांजगे, प्रज्ञा कांबळे (सर्व श्याम स्पोर्ट्स), तनया संकपाळ, अनुराधा गुले (प्रिन्सेन हॉकी), गौरी शिंदे (ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ) यांचा समावेश आहे. या चाचणीसाठी निवड समिती सदस्य म्हणून प्रशिक्षक अनिल परांडेकर, राहुल गावडे यांनी काम पाहिले. यावेळी सचिव मोहन भांडवले, खजानीस सागर जाधव उपस्थित होते.

फोटो (१४०९२०२१-कोल-हॉकी निवड चाचणी) : दि हॉकी कोल्हापूरतर्फे धनराज पिल्ले क्रीडांगणावर शनिवारी, रविवारी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळातील ३५ पुरुष, महिला खेळाडू सहभागी झाले.

Web Title: District team selected by The Hockey Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.