जिल्हा कोरोनामुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:57+5:302021-06-22T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळंबा : संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या कोल्हापूरवासीयांचे आपण कौतुक करत असून, जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या कोल्हापूरवासीयांचे आपण कौतुक करत असून, जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक ७५ सानेगुरुजी वसाहत येथील राजोपाध्ये नगरातील पालिकेच्या क्रीडा संकुलात संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या ‘लोकसहभाग कोविड सेंटर’च्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार ऋतुराज पाटील होते.
आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आलेली कोविड सेंटर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन लवकरच रिकामी व्हावीत, यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची अपेक्षा व्यक्त केली.
महापालिकेच्या आयुक्त प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोविड काळात सहकार्य करणाऱ्या कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा व प्रशासनाचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले.
नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने ३२ ऑक्सिजन आणि १६ विना ऑक्सिजन बेड लोकसहभागातून उपनगरवासीयांना उपलब्ध करून देता आल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेविका रिना कांबळे, डॉ. महादेव मोरे, चंद्रकांत कांबळे, सचिन चौगुले, आदी उपस्थित होते.
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ - राजोपाध्ये नगरातील पालिका क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या लोकसहभाग कोविड सेंटरच्या शुभारंभाप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.